‘अस्तित्वभान, विश्वभान, सर्जनशीलता, कल्पकता, संवेदनशीलता’ सारेच गमावून बसलेल्या आजच्या सायबरविश्वातल्या भूमीपासून तुटलेल्यांच्या या गोष्टी आहेत. प्रत्यक्ष ‘मी’ आणि दाखवायचा ‘मी’ यांतले अंतर तर दांभिकतेच्याही पलीकडे गेल्याचे कवीला गोष्टींच्या मोडतोडीतून सांगायचे आहे. परंपरा बदलली नाही उलटी झाली! विरुपित गोष्टींचा सध्याचा काळ आहे. त्यामुळे पूर्वीच्या गोष्टी बदलून सांगण्याचा पवित्रा या कवितांनी घेतला आहे.
– एकनाथ पगार
परंपरेने रचलेल्या मिथककथांचे समकालीन संदर्भात आकलन करून घेणारी दृष्टी या रचनांमधून प्रत्ययास येते. हरवलेल्या गावाचे मुक आक्रंदन आणि भौतिक प्रगतीच्या सर्वोच्च शिखरावर असताना मानवी संस्कृतीच्या वाट्याला येत असलेले शीघ्रचरित्रपतन यांबाबतचे संवेदनशील उद्गार व्यक्त करणारी ही एकूणच कविता परंपरेने हाती दिलेल्या मिथकथांचे पूनर्वाचन करताना समकाळाचा अंत:स्तर उसवून जगण्याच्या मर्मापर्यंत जाण्याचा प्रयत्न करते.
– आशुतोष पाटील
काही कवितांमध्ये म्याड्नेस असतो, इग्नेशियस च्या या कवितेत ‘controlled madness’ आहे. सैरावैरा भावावस्थेला पकडून उलटसुलट करून पाहणं, तिचा रंग, तिचा पोत, तिचा पदर, तीच अंतरंग असं एक एक करत तो बघत राहतो. तथाकथित अंगावर वगैरे येणारी ती कविता नसते. ती ताबा घेते. Conquest of mind! चांगल्या कवितेत रूपक आणि कविता सुट्या राहत नाहीत त्यातली ही कविता. mandness किवा वेडसरपणाला वेगळं परिमाण देणारी ही कविता आहे.
– स्वप्नील शेळके
कविता
स्तोत्रगीत १
मेंदूतल्या कोणत्याही खिडकीतून
बाहेर डोकावलं की
तुझं विराट दर्शन घडतं
तु गाण्यात
तु स्वरात
तु तालबद्ध
(कविता पूर्ण वाचण्यासाठी येथे क्लिक करा)
बातमीचा बॉम्ब
बातमी येत आहे, आपली प्रत राखून ठेवा
बातमी येत आहे, आमचं चॅनल वाजवत ठेवा
बातमी येत आहे, आमचं अॅप आजच इन्स्टाॅला
मी बातमीची वाट पाहत बसलोय
बातमी म्हणजे लाखातला एकमेव आध्यात्मिक क्षण
मी बातमीची वाट पाहत बसलोय
(कविता पूर्ण वाचण्यासाठी येथे क्लिक करा)
खरं म्हणजे हे
खरं म्हणजे हे एक तलाव आहे
ज्यात पाणी नाहीये
आपण अलगद पाय सोडतो तलावात
काठावर बसून
ओले होतात पाय
(कविता पूर्ण वाचण्यासाठी येथे क्लिक करा)
कवितासंग्रह
या ब्लॉगवरील कविता वाचा. आवडल्यास इतरांसोबत शेयर करा. तुमची प्रतिक्रिया मला कळवा. ह्या ब्लॉगवरील एखादी कविता किंवा सर्वच कविता किंवा एखादी ओळ तुम्हाला कुठे वापरावीशी वाटली, छापावीशी वाटली तर त्यासाठी माझ्या परवानगीची गरज नाही. ‘माझ्या परवानगीची गरज नाही’ हे सांगण्याइतकाही अधिकार माझा या कवितांवर नाही ह्याची मला नम्र जाणीव आहे. धन्यवाद!
अधिक कविता ऐकण्यासाठी विडियो गॅलरी पेजला भेट द्या.

