बाबेलच्या टॉवरचं बांधकाम
बांधकाम
टॉवरचं बांधकाम
बाबेलच्या टॉवरचं बांधकाम
वर्षानुवर्षे बाबेलच्या टॉवरचं बांधकाम
मजल्यावर अत्युच्च मजला
ईश्वरापासून दोन बोटांवर ओपन टेरेस
एकमेव ईश्वराची बोबडी वळली
सांडल्या एकापाठोपाठ बोबडीतून
असंख्य भाषा
आता निवडा तुमच्या आवडीची भाषा
आता बोला तुमच्या आवडीच्या भाषेत
आता बांधा टॉवर तुमच्या आवडीच्या भाषेत
आता बांधा टॉवरचे आपापले वर्जन्स
आपापल्या आवडीच्या भाषेत
थोडक्यात बांधकाम
टॉवर्सचं बांधकाम
बाबेलच्या टॉवर्सचं
बांधकाम कंटीन्यू