थ्रोट इन्फेक्शन

नोज इन्फेक्शन

कान डोळे जीभ दात

खिळी

 

थ्रोट इन्फेक्शनमुळे तुम्हाला बोलता येणार नाही.

मुळव्याध असूनही बोंबलता येणार नाही.

आराम करा.

बोलू नका.

घशाला त्रास देऊ नका.

 

डॉक्टर बोलले

खिळ घालून ठेवा सगळ्यांना

कितीही झोंबुदे मुळव्याध

बोंबलू नका

थ्रोट इन्फेक्शन बोकाळेल.

 

तुम्हाला थ्रोट इन्फेक्शन आहे

असं डॉक्टरांनी सांगेपर्यंत

मला कल्पनाही नव्हती की

इतकी मोठी थ्रेट मी घशात बाळगतोय.

आणि मुळव्याध साली झोंबून झोंबून

स्वत:ची गांड उघडी पाडतेय.