तुझं दुध प्यायलो मी
मुळव्याधीवर अक्सीर इलाज म्हणून
म्हणून तु माझी आईयेस
हे मी मान्य करतो
मी मान्य करतो
तुझ्या डोळ्यातलं करूण चिपाड
मी मान्य करतो
तुझ्या राजकिय पोटातील
तेत्तीस कोटी देवांचं अस्तित्व
मी मान्य करतो तुझं गुमुत्र
तिर्थ म्हणून
तु रस्त्याच्या मधोमध
ज्या जागेवर बसतेस ती
आपोआपच पवित्र होते
ह्यामागचं फिजिक्स माझ्या मेदूपलिकडचं आहे
मी त्याच्यात डोकं घालत नाही.
तुझ्या धारदार शेपटीखाली अडकलेली
माझी मान तेवढी सोडव माते