गोष्ट ऐकतच मी मोठा झालो
गोष्टीत एक अटळ युद्ध
युद्धात सगळं जाळून व्हायचं खाक
अपरीहार्य

मला गॅरंटीड यायची मजा
गोष्ट ऐकताना

गोष्ट खरं म्हणजे खूप साधी होती
एकाच शब्दाची

प्रेम

प्रेमाला चिकटले दुसरे अनेक शब्द
आणि वाढत गेला संघर्ष
गोष्टीमध्ये